सुरेश पाटील
सुरेश पाटील 
मराठवाडा

सहकार नेते सुरेश पाटील यांनी या कारणाने केली आत्महत्या 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सदाशिवराव गायके यांनी विद्यमान अध्यक्ष सुरेश पाटील यांच्याविरुद्ध सोमवारी (ता. 25) सकाळी अपहरणाचा प्रयत्न व धमकावल्याप्रकरणी तक्रार दिली. ही बाब समजताच पाटील यांनी गत वीस वर्षांपासून सुरू असलेला मनस्ताप सहन होत नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून आत्महत्येचे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी दिली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गायके यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात सकाळी तक्रार दिली. त्यात एका वाहनातून दोन जण आले. त्यांनी धमकावून अपहरणाचा प्रयत्न केला, असे नमूद करून चौघांसह पाटील यांच्यावरही आरोप केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी घटेनचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजही तपासले; मात्र वेदांतनगर पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस प्रणालीमुळे तक्रार नोंदवून घेण्यास उशीर झाला. त्यामुळे न्यायालयात जाऊन गायके परत आले. यानंतर तक्रारीची प्रक्रिया पूर्ण झाली. ही बाब पाटील यांना समजल्यानंतर ते व्यथित झाले. वीस वर्षांपासून सुरू असलेल्या त्रासातून त्यांनी आत्महत्या केली, अशी बाब समोर आल्याची माहिती उपायुक्त खाटमोडे यांनी दिली. 
 
मनस्ताप सहन होत नाहीये..  
पोलिसांनी पाटील यांच्या खोलीची तपासणी केली. त्यावेळी त्यांना एक पानी चिठ्ठी सापडली. त्यात आता मनस्ताप सहन होत नाही. वीस वर्षांपासून त्रास सुरू आहे. असा मजकूर नमूद करून त्यात सदाशिवराव गायके व नाना पाटील यांची नावे पाटील यांनी नमूद केल्याची माहिती समोर आली. 
 
असा होता जुना वाद 

  • जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष ऍड. सदाशिवराव गायके यांनी विद्यमान अध्यक्ष सुरेश पाटील व कुटुंबीयांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपसंपदा गोळा केल्याची तक्रार दिली होती. 
  • जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सुरेश पाटील यांनी 52 सहकारी संस्थांकडील साडेआठ कोटींचे कर्ज माफ केल्याची तक्रार गायके यांनी तत्कालीन पोलिस आयुक्तांकडे केली होती. यात पाटील यांच्यासह सर्व संचालकांवर गुन्ह्याची नोंद झाली. दरम्यान, हा गुन्हा न्यायालयात रद्द झाला. 
  • गुन्हा रद्द झाल्यानंतरही गायके यांनी पाठपुरावा कायम ठेवला. या प्रकरणात पोलिसांनी एसआयटी स्थान करून स्वतंत्र तपास सुरू केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT